![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):जुना खंडाळा येथील श्री खंडोबा देवस्थान मंदिरात श्री मल्हारी मार्तंड भगवान व नंदी प्रतिष्ठापणा सोहळा उत्सहात पार पडला.
चैत्र शुद्ध पंचमी शके 1945 ला जलदिवस अभिषेक व धन्यदिवस कार्य पार पडले. त्यानंतर कार्यारंभ व प्राणप्रतिष्ठापणा सोहळा जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.मंडळाच्या वतीने मूर्तिची विधिवत वाजत गाजत भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक मंदिरापर्यंत काढण्यात आली. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी अभिषेक,होम हवन आणि महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले होते.
विधिवत मूर्ती प्रतिष्ठापनेचे महत्व व त्यामागील उद्देश गुरुजींनी समस्त उपस्थितांना विषद केला.यावेळी जुना खंडाळा येथील भाविक भक्तांनी मोठ्या भक्तीभावाने प्रतिष्ठापानेत सहभाग घेतला.
मूर्ती प्रतिष्ठापनेला खंडोबा मंदिराचे संस्थापक गेनूभाऊ कडू, माजी नगरसेविका अंजना बाळासाहेब कडू, हं भ.प. मानिक मोकाशी, आनंद शिंदे, किशोर राऊत, सतीश राऊत,अमित भोसले,अजय भोईर,वसंत भोसले,पत्रकार प्रदीप वाडेकर,राजेंद्र कडू, कुंडलिक दळवी,शंकर कुटे, संतोष पासी,नरेंद्र घोलप, सुनील आसवले,गणेश देशमुख,रुपेश कुंभार ,किरण हुळावले, कैलास हेमाडे, जांभूळकर, किशोर कोंडे, अशोक मते,अशोक उंबरे, वसंत वाळंज, सोपान केदारी, सुनील पटेकर, सुधीर दरडे, संदीप बडेकर,निखिल दाभाडे, किरण बैकर, चैतन्य वाडेकर, कुणाल कडू, तसेच महिला भगिनी व ग्रामस्थ यांनी सहभाग व सहकार्य केले.प्रतिष्ठापणे नंतर महाप्रसाद व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.