Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळाजुना खंडाळा येथे आणखी एका तरुण पर्यटकाचा स्वीमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू…

जुना खंडाळा येथे आणखी एका तरुण पर्यटकाचा स्वीमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी) : परिसरात स्विमिंगपूल मध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटने मध्ये वाढ होत आहे. ह्या घटना थांबायचे नाव घेत नसल्याने लोणावळा परिसरातील स्विमिंगपूल व त्यामधील सुरक्षा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जुना खंडाळा भागातील एका खाजगी बंगल्यात मंगळवार दि.3 रोजी रात्री उशिरा स्विमिंगपूल मध्ये बुडून एका तरुण मुलाचा मृत्यू झाला ही दुर्घटना घडली आहे.
निखिल संपत निकम (वय 22, रा. चिंचवड) असे या मयत झालेल्या पर्यटक तरुणाचे नाव आहे.मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निखिल व त्याचे काही मित्र चिंचवडवरून लोणावळ्यात आले होते. त्यातील निखिल याचा मंगळवारी रात्री उशिरा स्विमिंगपूल मध्ये बुडून मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेची माहिती कळताच लोणावळा शहरचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर व पथक घटनास्थळी दाखल झाले असून दुर्घटना कशी घडली याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page