जुन्या मुबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात दोन जण जागीच ठार तर एकजण जखमी..

0
199
जुन्या मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर शिलफाट्याजवळ ट्रक ने दिली कार ला जोरदार धडक दोन जण जागीच ठार एक जण जखमी ट्रक आणि कारचाही चक्काचूर..

खापोली (दत्तात्रय शेडगे)मुबंई पुणे जुन्या महामार्गावरून पुण्याहून मुबंई कडे सिमेंटघेऊन जाणार ट्रक चा शिलफाटा जवळील पटेल नगर येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने ट्रक ने समोरील कार ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाले असून ट्रक आणि कारचाही चक्काचूर झाला आहे.ट्रक एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट वरून जुन्या महामार्गाने.

खोपोली कडे जात असताना शिलफाटा जवळील पटेल नगर येथील उतारावर आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने ट्रक मधून उडी मारली तर ट्रक ने समोरील कार ला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला यात ट्रक चालक आणि पादचारी अश्या दोघांचा जागीच मृत्यू झाला क्लिनरचा जखमी झाला आहे तर यात ट्रक आणि कारचाही चक्काचूर झाला.