जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे मेंढपाळाच्या हस्ते उदघाटन…

0
167


आमदार गोपीचंद पडळकर यांचा गनिमी कावा,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार होते आज उदघाटन.शरद पवार हे भ्रष्टवादी नेते गोपीचंद पडळकर शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका..

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.

धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुतळ्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मेंढपाळाच्या हस्ते आज पहाटे उदघाटन करून आमदार पडळकर यांनी गनिमी कावा केला.

जेजुरी संस्थांनच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा जेजुरी गडावर बसविण्यात आला आहे त्याचे उदघाटन आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार होते.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह आज पहाटे गडावर जाऊन मेंढपाळाच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. शरद पवार हे भ्रष्ट्रवादि नेते असून त्यांनी आमचे दैवत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला हातही लावू नये अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
यावेळी गडावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.