Thursday, May 30, 2024
Homeपुणेलोणावळाजेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद....

जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद….

लोणावळा : शहरातील वरिष्ठ नागरिक संघाच्यावतीने आज सोमवार दि.11ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदी मराठी गाण्यांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन चंद्रलोक हॉटेल येथे करण्यात आले होते.

लोणावळा येथील चंद्रलोक हॉटेल येथे वरीष्ट नागरिक संघातर्फे बुधवारी होणारा कार्यक्रम काही कारणास्तव आज सोमवारी आयोजित करण्यात आला होता.त्यानिमित्त हिंदी मराठी गाण्याचा एक बहारदार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता सदर कार्यक्रमात प. किरण परळीकर यांचे शीष्य व प्रसिद्ध वकील निलेश अग्रवाल यांनी गायन सादर केले.


कार्यक्रमात जुनी हिंदी गाणी, मराठी गाणी व अभंग तसेच कव्वाली यांचा प्रामुख्याने समावेश असल्याने सर्व श्रोते रसिक प्रेमिंनी खूप मनोरंजन यावेळी केले.या गायन मैफिलीत
घनि खंडेलवाल, सत्य अगरवाल, सविता परदेशी तसेच बॉलिवूड चे प्रसिद्ध तबला वादक उस्ताद शरीफ खान साहेब यांनी अग्रवाल यांची साथ दिली.


यावेळी जेष्ठ नागरिकसंघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, उपाध्यक्षा मृदुला पाटील, उपाध्यक्षा संध्या गव्हले, कार्यवाहक सुशीला गावडे, कोषाध्यक्ष गोरख चौधरी, सहकोषाध्यक्ष विनायक देशपांडे, सदस्य पांडुरंग हार्डे, सदस्य आत्माराम लोखंडे, सदस्या शांता डिसले, अश्विनी धारप, कविता मावकर, सल्लागार दिपक गंगोळी, अरविंद मेहता, नामदेव डफळ व शंकरराव गुंड इत्यादी संघांचे पदाधीकारी व सदस्यांच्या उपस्थित अनेक श्रोते रसिक मंडळींनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

- Advertisment -

You cannot copy content of this page