Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडजेष्ठ निरूपणकार डॉ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षलागवड व संवर्धन अभियान..

जेष्ठ निरूपणकार डॉ.ति.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षलागवड व संवर्धन अभियान..

डिकसळ येथे आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते संपन्न..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
जेष्ठ निरुपणकार डॉ. ति. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ बैठक प्रतिष्ठाण डिकसळच्या वतीने वृक्ष लागवड व संवर्धन अभियान राबविण्यात आले.सदर कार्यक्रम तातोबा मंदिर टेकडी, डिकसळ येथे आयोजित केला होता .यावेळी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बैठकीचे जनक व पुज्यनिय दासबोध ग्रंथातून निरूपण करून तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांनी अध्यात्माचे धडे देताना शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली.

त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.नानासाहेब धर्माधिकारी यांनी आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य अर्पण केले.

अशा जेष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना स्मृतिदिनी अभिवादन करताना आमदार महेंद्रशेट थोरवे म्हणाले की,या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय नानासाहेबांचे विचार ऐकता व मांडता आले. नानासाहेबांच्या अथांग कर्तृत्वाला आणि नेहमीच समाजकार्याचे भान राखणाऱ्या अखंड श्री सदस्य परिवाराला नमन ,करून जय जय रघुवीर समर्थ ! म्हणत तिर्थस्वरूप निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन केले.यावेळी आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या समवेत कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे, उप सरपंच भारती पाटील, सदस्य प्रसाद भासे, मंगेश ठोंबरे,कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे, अभिषेक सुर्वे आणि मोठ्या प्रमाणात श्री सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page