Wednesday, October 16, 2024
Homeपुणेलोणावळाजेष्ठ पत्रकार कै. दत्तात्रय गवळी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण…

जेष्ठ पत्रकार कै. दत्तात्रय गवळी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण…

लोणावळा : लोणावळ्यातील ज्येष्ठ पत्रकार व माजी उपनगराध्यक्ष कै. दत्तात्रय कोंडीबा गवळी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी गवळीवाडा येथील श्रीराम क्रिडांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दत्तू भाऊंची लोणावळा शहराच्या राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख होती. लहान मोठ्या प्रत्येकामध्ये मोठ्या उत्साहाने ते कायम सहभागी होत असत. सर्व पक्षियामध्ये त्यांना आदराचे स्थान होते. बुलंद मावळ या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता कायम ठेवली होती. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणा निमित्त हे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट चे अध्यक्ष दिलीप भाऊ लोंढे आणि ट्रस्टचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.तसेच माजी नगराध्यक्ष राजु गवळी , माजी नगरसेवक निखिल कविश्वर ,धीरूभाई कल्याणजी,नारायण आंबेकर, सुधीर शिर्के, अशोक मावकर, आदित्य रमेश व्यास, मुरली लोहर, रामदास साठे, सुधाकर साळुंखे, संजय गवळी, संभाजी भानुसघरे, नारायण शारवाले, मनिष गवळी, प्रशांत गवळी, सुर्यकांत औरंगे, दिनेश जानुबस, भरत खंडेलवाल, मंगेश बालगुडे, आकाश परदेशी, चेतन औरंगे, संभाजी गवळी, सुखदेव बालगुडे, प्रकाश घरदाळे, राजु भि. गवळी, मनोज गवळी, संतोष हिरणवाळे, किशोर अवशीकर, अक्षय बिडकर, प्रमोद आंबेकर, अमोल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page