if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )ज्यावेळी येथील नेतृत्व मा. आमदार ” सुरेश भाऊ लाड ” यांना तुमची गरज होती , त्यावेळी त्यांची साथ सोडून एका ” अदृश्य शक्तीच्या ” बोटावर नाचून ” केसाने गळा कापलात ” , आणि आज तुम्ही लाड यांनी या मतदार संघात काम केले असे सांगता , कारण तुम्हाला गरज आहे म्हणून , लाड साहेबांनी आपली पूंजी खर्च करून तुम्हाला २०१४ साली तुम्ही ” लायक उमेदवार ” नसताना तुम्हाला मैदानात उतरवून ” बीड जिल्हा परिषद ” प्रभागातून निवडून आणले , पण त्यानंतर जिल्ह्याचे वारे लागल्याने हे सुधाकर घारे बदलले , असा घणाघाती प्रहार कर्जत न. प. चे माजी नगराध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते राजेश दादा लाड यांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यावर करत पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला . महायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ थोरवे यांची बाजू मांडताना शिवतीर्थ पोसरी येथे ते बोलत होते .
यावेळी या पत्रकार परिषदेत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उप जिल्हा प्रमुख भाई गायकर , जिल्हा संघटक संभाजी जगताप , आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , भाजप उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , आर पी आय कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल भाई डाळींबकर , भाजप जिल्हा नेते , तानाजी चव्हाण , मा. उपाध्यक्ष भाई शिंदे , ता प्रमुख संदेश पाटील , भाजप ता. अध्यक्ष राजेश भगत , किसान मोर्चा कोकण प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , मा. नगराध्यक्ष डॉ . सुनील भाऊ पाटील , जिल्हा सचिव रमेश मुंडे , पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम , महेंद्र निगुडकर , संघटक अरुण देशमुख , शहर प्रमुख संजय मोहिते , त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी राजेश दादा लाड पुढे म्हणाले की , कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो , असे समजून सुरेश भाऊ लाड यांनी सुधाकर घारे यांना प्रचंड मेहनत घेवुन निवडून आणले . यावेळी भाऊनी यांना ” मोकळीक दिली ” म्हणून तुमचे ” अस्तित्व ” तयार झाले , माझ्या शिफारशीनुसार तुम्हाला युवक तालुका अध्यक्ष पद दिले , त्या अदृश्य शक्तीला आपल नाव देखील माहित नसेल , भाऊ नी ” राजिपचे उपाध्यक्ष ” केल्यावर जिल्ह्याची हवा लागून भाऊ ना डावलून तुम्ही काम केले , त्यावेळी अनेक जन म्हटले होते , ” हाच तुमचा काळ ठरणार ” , चुकीच्या माणसाला तुम्ही उपाध्यक्ष पद दिले आहे , आज ते खर ठरल आहे , मी राजकीय हेतूने किंवा द्वेषाने बोलत नाही , तर सत्य सांगत आहे . यावर प्रकाश त्यांनी टाकला .
कोंढाणा धरण होणे हे भाउंच स्वप्न होत , त्यासाठी पायी दिंडी काढली , या अपक्ष उमेदवाराने आदिवासी बांधवांना मिळालेल्या पैशावर डोळा ठेवून आदिवासी बांधवांना बेघर करण्याचे कारस्थान यांनी केले , आज जो निवडणुकीत खर्च केला जातोय , त्याचे स्त्रोत हे कोंढाणा धरण आहे . ज्याचा राजकीय इतिहास ८ वर्षे असेल तो कुठला देव माणूस , असा संतप्त सवाल उपस्थित करत , सुरेश भाऊ लाड यांना राजकारणातून समाप्त करण्याचा ” अघोरी ” विचार तुमचा होता , म्हणूनच ” अदृश्य शक्तीच्या ” इशाऱ्यावर यांनी केसाने भाऊचां गळा कापला , असा घणाघाती आरोप , अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या वर केला . म्हणूनच भाऊंचे आशीर्वाद घेण्याची वेळ तुम्ही गमावली आहे , असे स्पष्ट केले . मात्र माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांना राजकारणातून उठवणारी ती ” अदृश्य शक्ती ” कोण ? याचे उत्तर मात्र राजेश दादा लाड यांनी दिले नाही . मात्र या निवडणुकीत त्यांना धडा शिकवून महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना धनुष्य बाण चिन्हावर मते देवून निवडून आणून येथे ” भगवा ” फडकवणार , असे भाकीत त्यांनी या पत्रकार परिषदेत केले .