झालावाडी कोविड केअर सेंटरला मास्क व काढा वाटप, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम….

0
121
लोणावळा दि. 28 : क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे झालावाडी कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, सेवक, सेविका यांना क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तर्फे काढा व मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
झालावाडी कोविड केअर सेंटर चे डॉक्टर अमिताभ चटर्जी, डॉक्टर आलिया सय्यद, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे जावेद अली व नगरपालिका कर्मचारी यांना काढा व मास्कचे वाटप करण्यात आले त्यावेळी क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्षा पत्रकार श्रावणी कामत, ऑक्झीलिअम कॉन्व्हेंटच्या शिक्षिका आसमा निंबरगी, दिपाली वाकडकर, श्रिया रहाळकर, पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस अबोली वाकडकर, आदित्य कामत, नंदिका कामत, पत्रकार संदीप मोरे, पत्रकार विशाल पाडाळे आदी जण उपस्थित होते. त्यावेळी झालावाडी कोविड केअर सेंटर येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना काढा व मास्क वाटप करून तेथील रुग्णांकडून प्रशासकीयसुविधांचा आढावा घेत प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
तसेच ऑक्झिलिअम कॉन्व्हेंटच्या शिक्षिका व उपस्थित विद्यार्थींनींनी कोविड केअर सेंटरचा आढावा घेतला. सदर कार्यक्रमावेळी डॉ. अमिताभ चटर्जी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोविड केअर सेंटरला शासकीय सुविधा असून दानशूर व्यक्तींनीही कोविड केअर सेंटरला मदत करण्यासाठी पुढे यावे तसेच कोरोनावर मात करून बरे झालेल्या नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता आपला प्लाझ्मा डोनेट करून इतर रुग्णांना बरे होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यावेळी डॉ. चटर्जी यांनी बोलताना केले .