![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ (प्रतिनिधी) : योगासन स्पर्धेत मावळचे नाव लौकिक करणारे देवीक महादेव भवर व लक्ष महादेव भवर यांचा टाकवे खुर्द ग्रामस्थ व भैरवनाथ उत्सव कमिटी, गुरुदेव दत्त प्रतिष्ठान आयोजित सत्कार समारंभ टाकवे खुर्द येथे दि.1 जानेवारी रोजी सायंकाळी संपन्न झाला.
वाकसई मावळ येथील देवीक महादेव भवर आणि लक्ष महादेव भवर या दोन्ही बंधूंनी सातारा येथील विभागीय योग स्पर्धेत केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचे संपूर्ण मावळातून कौतुक केले जात असून टाकवे खुर्द येथील ग्रामस्थांच्या वतीने, भैरवनाथ उत्सव कमिटी तसेच गुरुदेव दत्त प्रतिष्ठानच्या वतीने देवीक भवर आणि लक्ष भवर यांचा पुष्प गुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पप्पू शेठ गरुड, विश्वास ढमाले,योगेश गरुड, विकास इगतपुरी, प्रमोद धुमाळ, राजू गावडे,अजय धुमाळ, प्रेमनाथ गरुड,पप्पू सुतार, ओंकार धुमाळ, मुकुंद, साहिल गरुड आदींसह भैरवनाथ उत्सव कमिटीचे सर्व सदस्य तसेच गुरुदेव दत्त प्रतिष्ठान टाकवे खुर्दचे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ उपस्थित होते.