Saturday, July 27, 2024
Homeपुणेमावळटाकवे (खुर्द ) येथील तीन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह..

टाकवे (खुर्द ) येथील तीन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह..

मावळ- (अष्ट दिशा न्यूज मावळ प्रतिनिधी -रोशनी ठाकूर कार्ला प्रतिनिधी -गणेश कुंभार ) टाकवे येथे दि. 10 जुलै रोजी कोरोना रूग्णाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता. त्याच कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 37 वर्षीय मुलगा तर 50 वर्षीय पत्नी 32 वर्षीय सून अशा एकूण तीन जणांचे कोरोना अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत.सदर व्यक्तींना कोरोना ची लक्षणे दिसुन आल्याने ह्या तिन्ही पेशंटचे कोविड केअर सेंटर लोणावळा येथे दि.11 जुलै रोजी स्वॅब घेण्यात आले होते.

13 जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटीव्ह आला असुन त्यांच्यावर तळेगाव येथील जनरल हाॅस्पिटल येथे उपचार सुरू आहेत तर संपर्कात आलेल्या हाय रिक्स कॉन्टॅक्ट म्हणून आणखी सहा व्यक्तींचे स्वॅब हे लोणावळा कोविड सेंटर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.अशी माहिती कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ. भारती पोळ, आरोग्य सेवक प्रसाद बिराजदार,शिवाजी चव्हाण यांनी दिली.मावळ मध्ये कोरोना रोगाने ग्रामीण भागात अहाकार माजवला असुन कोरोना रुग्णांमध्ये रोज वाढ होताना दिसुन येत आहे.वेहरगाव , शीलाटने, मळवली, भाजे टाकवे या गावांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आल्याने व पुन्हा टाकवे येथील कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल हे पॉझिटीव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परंतु नागरिकांनी न घाबरता स्वाःची काळजी घेतली पाहिजे ,माक्स चा वापर आणि सोशल डीस्टंन्सिंग च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना रोगाशी लढले पाहीजे.

- Advertisment -

You cannot copy content of this page