Tuesday, May 28, 2024
Homeपुणेमावळटाकवे खुर्द येथे " जन औषधी दिवस " साजरा…

टाकवे खुर्द येथे ” जन औषधी दिवस ” साजरा…

कार्ला (प्रतिनिधी): प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला अंतर्गत येणाऱ्या आयुष्यमान भारत-आरोग्यवर्धिनी उपकेंद्र टाकावे खुर्द येथे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतुन दि.6 रोजी “जण औषधी दिवस” साजरा करण्यात आला.
उपकेंद्र टाकावे खुर्द कार्यक्षेत्रातील उच्च रक्तदाब व मधुमेह रूग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना जेनेरिक औषधी वापरा बद्दल समुपदेशन करण्यात आले. तसेच त्यांना महिनाभर पुरेल एवढी BP व Diabetes ची जेनेरिक औषधे देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व हेल्थ वेलनेस सेंटर व नजीकच्या जेनेरिक मेडिकल स्टोरमध्ये सहजपणे औषधे मिळणार असून यामुळे रुग्णांना फायदाच होणार आहे.
जण औषधी दिवस साजरा करताना टाकवे गावचे विद्यमान सरपंच तुशांत ढमाले, ग्रामसेवक मनीषा ओतरी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. चेतन पवार, आरोग्य सेवक प्रसाद बिराजदार,तसेच आशा वर्कर आरती गरुड, श्रीमती जयश्री मोरे, सीमा थोरात व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page