टाकवे गावात आढळून आला कोरोना रूग्ण मावळ मधील रुग्णांची संख्या 177 वर.

0
2722

मावळ- दी.10 जुलै 2020 अष्ट दीशा न्यूज प्रतिनिधी गणेश कुंभार टाकवे ( खुर्द )टाकवे येथे आज 55 वर्षीय पुरुषाचा कोरोना रूग्णाचा आहवाल हा पाॅझीटीव आला आहे. सदर व्यकतीला निमोनीया सदृश्या लक्षने आढळून आल्याने दी.9 जुलै रोजी त्याचा स्वॅब तळेगाव जनरल हाॅस्पीटल येथे नेण्यात आला होता. त्याचा कोरोना अहवाल हा आज दी .10 जुलै ला पाॅझीटीव आला असुन सदर रुग्णावर तळेगाव येथील जनरल हाॅस्पीटल येथे उपचार सुरू आहेत.

सदर व्यक्ती च्या संपर्कात आलेल्या 9 व्यक्तींना हायरीस्क वर ठेवण्यात आले आहे तर संपर्कात आलेल्या 3 व्यकतींचे स्वॅब चेक करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. सदर व्यक्ती ही कार्ला फाटा येथे भाजीचा व्यवसाय करत होता.व खेड, पुणे , मंचर येथून जी पाला वीक्री साठी आणण्यासाठी साठी जात होता असे समजत आहे.तसेच कंटेन्टमेन्ट झोन टाकवे तर बफर झोन म्हनुन फांगने या गावांना जाहीर केले आहे.आशी माहीती कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ. भारती पोळ यांनी दीली.