Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्रमुंबईठाण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड: एका महिलेसह तीन जणांना अटक..

ठाण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड: एका महिलेसह तीन जणांना अटक..

ठाणे दि.९. पोलिसांनी पॉश एरियामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून कारवाई केली एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे.अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की जबरदस्तीने वेश्या व्यवसायात अडकलेल्या दोन महिलांनाही या टोळीच्या तावडीतून मुक्त करण्यात आले.

गुप्त माहितीच्या आधारे मानव-तस्करी विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला ग्राहक बनवून सोमवारी आरोपीकडे पाठविले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने ग्राहकांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सासुपाडा गावात एका हॉटेल मध्ये बोलावले होते.

महिला दोन साथीदार बरोबर तिथे आले होते.यानंतर तिन्ही आरोपींना पकडण्यात आले आणि तेथे वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांना मुक्त करण्यात आले.आरोपींमध्ये ऑटो रिक्षाचालकही शामिल होता. या महिलांना ग्राहकांच्या घरी किंवा हॉटेल्समध्ये सोडण्याचं काम तो करत होता.

- Advertisment -