Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडठिय्या आंदोलन किंवा रेल रोको करायला लावू नका-आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा...

ठिय्या आंदोलन किंवा रेल रोको करायला लावू नका-आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा इशारा..

भिसे गाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) पुण्याहून कर्जतला येण्याकरिता तब्बल साडेसात तास एकही गाडी नसल्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी एक निवेदन पाठवून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे दिले आहे. कर्जतकरांसाठी काही गाड्या थांबवून सोय करावी , अशी विनंती त्यांनी केली आहे , मला नाईलाजाने ठिय्या आंदोलन किंवा रेल रोको करायला लावू नका , असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पुण्याहून सकाळी 7.50 ची 12126 प्रगती एक्सप्रेस गेल्यानंतर दुपारी 3.15 ला 11008 पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस आहे म्हणजेच पुण्याहून सकाळी 7.50 ते दुपारी 3.15 दरम्यान पुण्याहून कर्जतला येण्याकरिता एकही गाडी नसल्याने प्रवासींना भयंकर त्रास होत आहे व रेल्वे प्रशासनावर भयंकर नाराजी व्यक्त करत आहे. पूर्वी हैदराबाद एक्सप्रेस कर्जतला थांबत असल्यामुळे व पुणे भुसावळ गाडी असल्यामुळे तसेच पुणे कर्जत शटल सेवा असल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होत होती परंतु वरील तिन्ही गाड्यांचा कर्जतला थांबा नाही. यातील काही गाड्या दुसरीकडे वळण्यात आले आहेत तर काही गाड्यांचे थांबे रद्द केले आहेत.
त्यामुळे कर्जतकरांमध्ये नाराजी पसरली गेली आहे. पुण्याहून कर्जतला येण्याकरता सुमारे साडेसात तास गाडी नसल्यामुळे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे लक्ष असून रेल्वे प्रशासनास विनंती केली आहे. याबाबतीत त्वरित काहीतरी मार्ग काढून काही गाड्या ज्या कर्जत मार्गे जातात पण थांबत नाही त्या गाड्यांना कर्जातला थांबा द्यावा, अशी विनंती केली आहे.

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सदर निवेदनात असेही म्हटले आहे की वर उलेख केलेल्या वेळमध्ये कर्जतसाठी गाड्या थांबवा. या बाबतीत मला नाईलाजाने कर्जत रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन किंवा रेल रोको करावे लागू नये. असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ही समस्या दूर करण्याकरिता रेल्वे प्रशासनाने हैदराबाद एक्सप्रेस या गाडीचा कर्जतला थांबा पुन्हा सुरू करावा तसेच भुसावळ – पुणे ही गाडी पुन्हा कर्जत मार्गे सोडण्यात यावी. तसेच गरिबांची ओळखली जाणारी पुणे कर्जत शटल सेवा ही सुरू करण्यात यावी. जेणेकरून कर्जत करायची नाही परंतु परंतु संपूर्ण कर्जत तालुका व मुंबईपर्यंत सगळ्यांची सोय होणार आहे.असे मत पंकज मांगीलाल ओसवाल – सामाजिक कार्यकर्ते, कर्जत यांनी व्यक्त केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page