डिकसळ नाक्यावर स्ट्रीट लाईट नियमित सुरु करा अशी समाजसेवकाची मागणी…

0
190

दि.४ भिवपुरी कर्जत-कल्याण महामार्गावरील डिकसळ येथील नाक्यावर स्ट्रीट लाईट दुरुस्ती आणि नियमित करण्याची मागणी रायगडभूषण किशोर गायकवाड यांनी केली आहे. तसेच कोरोना महामारीसह मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फवारणी करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

कर्जत-कल्याण महामार्गावर असलेल्या डिकसळ येथे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात बांधकामे आणि दुकाने झाली आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने सदर व्यावसायिक नाराजी व्यक्त करतात. डिकसळ नाका येथील आयडीबीआय बँक ते ओमकार अपार्टमेंटपर्यंतच्या रस्त्यावरील लाईट मागील महिनाभरापासून बंद आहे. तसेच, शांतीनगर येथील भारतीय संविधान स्तंभाजवळील लाईट जवळपास पंधरा दिवसांपासून बंद आहे. सदर लाईट चालू करण्याची मागणी गायकवाड यांनी केली असून याबाबतचे पत्र किशोर गायकवाड यांनी उमरोली ग्रामपंचायतीला दिले आहे.

कोरोना रोखण्यासाठी फवारणी करावी
मागील काही दिवसांपासून उमरोली ग्रामपंचायत हद्दीतही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतिने कोरोनासह मच्छरांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फवारणी करण्याची मागणीही गायकवाड यांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.