Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडडिकसळ शांतीनगर येथील भारतीय संविधान दिन उत्साह साजरा….

डिकसळ शांतीनगर येथील भारतीय संविधान दिन उत्साह साजरा….

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)

दि.26कर्जततालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ शांतीनगर येथे शांतीदूत मंडळच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला आहे.

यावेळी संविधान स्तंभाला मानवंदना उपस्थित प्रमुख उमरोली ग्रामपंचायत सदस्या भारती विजय पाटील,संध्या दिपक पाटील,प्रचिती सचिन गायकर,तेजस भासे,प्रसाद भासे, भास्कर लोंगले,यांनी पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्जवलीत करण्यात आली आहे.

तसेच संविधान प्रास्ताविक वाचन कु.प्रणाली किशोर गायकवाड हीने केले आहे.बुध्दाविहारा मध्ये बुध्दपुजा उपासक रमेश गायकवाड यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले आहे.

याठिकाणी संविधान कार्यक्रमाचे प्रस्ताविक रायगड भुषण किशोर गायकवाड यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे संविधान विषयी
मनोगत व्यक्त करण्यात आले आहे.
यावेळी.आर.पी आय पदाधिकारी मनोज गायकवाड,किशोर जाधव,अमर जाधव,रायगड जिल्हा पोलिस मिञ संघटनाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,उत्तम ठोंबरे,रामदास शेलार,शिवसेना शाखा प्रमुख डिकसळ समिर साळोखे, समाजिक कार्यकर्ते,किरण बोराडे,संतोष शेळके,दशरथ आहीर,जेष्ठनागरीक काशिनाथ गायकवाड,शंकर हिरे,हरीश्चद्र हिरे,अनंता भोईर,यशवंत चव्हाण,रमाबाई महिला मंडळ संगीता गायकवाड,हिराताई हिरे, गुलाब गायकवाड,मिराबाई हिरे,अंजना गायकवाड,पुप्षलता गायकवाड,रेखा गायकवाड शांतीदूत मंडळचे सचिव निखिल गायकवाड,जिवक गायकवाड, प्रशिक गायकवाड सतिश गायकवाड,अशोक गायकवाड, मधुकर गायकवाड,इत्यादी आदीसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी डिकसळ परिसरातील आणि महिला वर्गानी संविधान दिनाच्या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि सर्व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -