Friday, December 27, 2024
Homeपुणेलोणावळाडिसेंबर मधील संपर्क हेरिटेज वॉक ह्यावर्षी रद्द....

डिसेंबर मधील संपर्क हेरिटेज वॉक ह्यावर्षी रद्द….

लोणावळा : डिसेंबर मधे होणारी भाजे ते लोहगड संपर्क हेरीटेज वॉक ही पदयात्रा या वर्षी कोविड 19 आजारामुळे रद्द करण्यात आली आहे.मावळ तालुक्यातील ऐतिहासिक पुरातन वास्तु व गडकिल्ले यांच्या जन जागृती करिता तसेच पर्यटनाला चालना देणारी संपर्क हेरीटेज वॉक ही सांस्कृतिक पदयात्रा या वर्षी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली आहे.

गेली चार वर्षे सातत्याने संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बेनर्जी यांच्या पुढाकाराने आणि मावळ तालुक्यातील गड संवर्धन संघटना यांच्या सहकार्याने संपर्क हेरीटेज वॉक मोठ्या उत्साहात सुरू असते. संपर्क हेरीटेज वॉक या पदयात्रेत हजारो इतिहास प्रेमी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात, आणि महाराष्ट्राच्या लोककलांचा व अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत असतात.

महाराष्ट्राची संस्कृति, लोककला, परंपरा यांचे दर्शन घडविणारी तसेच येथील लेण्या आणि गड किल्ल्यांची महती सांगणारी ही पदयात्रा काही काळातच अनेक इतिहास प्रेमींसाठी परिचित झाली होती.या संपर्क हेरिटेज वॉक ची महाराष्ट्रातीलच नव्हे तर जग भरातील अनेक इतिहास प्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात.


पण या वर्षी कोविड 19 च्या संकटामुळे सर्वच विस्कळीत झाले आहे. कोरोना चा प्रादुर्भाव पाहता अशी भव्य पदयात्रा होणे अशक्य आहे. सर्व गोष्टींचा विचार करून या वेळेस डिसेंबर महिन्यात होणारी संपर्क हेरीटेज वॉक रद्द करण्यात आली आहे.आणि पुढील वर्षी ही पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडेल अशी आशा संपर्क हेरीटेज वॉक चे मुख्य मार्गदर्शक संपर्क संस्थेचे संस्थापक अमित कुमार बेनर्जी यांनी व्यक्त केली आहे. तसेच यावर्षी हा सांस्कृतिक सोहळा आयोजित होत नसल्याबद्दल तमाम इतिहास प्रेमींची अमित कुमार बेनर्जी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page