डी. सी.हायस्कुल मधील शपथ ग्रहण समारंभ उत्साहात संपन्न , विध्यार्थ्यांना मार्गदर्शन !

0
45

लोणावळा : डी. सी. हायस्कुल खंडाळा मध्ये विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेल्या व विद्यार्थ्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना त्यांची कर्तव्य व जबाबदारी व्यवस्थित रित्या पार पाडण्याची शपथ देण्यात आली . लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती व शाळेचे माजी विद्यार्थी जितेंद्र धिरजलाल कल्याणजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या शपथग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सी.ई.ओ. फ्रान्सिस बरेटो होते . दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ विंचूरकर यांनी मान्यवरांचे स्वागत व सन्मान केला .

यावेळी नवनिर्वाचित विद्यार्थी प्रतिनिधी हेड बॉय , हेड गर्ल , स्पोर्टस कॅप्टन बॉय , स्पोर्टस कॅप्टन गर्ल , हाऊस कॅप्टन , वॉईस कॅप्टन , प्रिफेक्टर्स आणि मॉनिटर्स यांना प्रमुख पाहुणे , अध्यक्ष , मुख्याध्यापक , क्रिडा शिक्षक व सर्व शिक्षकांच्या हस्ते स्कार्फ , बॅजेस , फ्लॅगर्स व बोर्डस यांचे वितरण करण्यात आले . यानंतर बोलताना प्रमुख पाहुणे जितेंद्र कल्याणजी यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव सांगितले . तसेच नेतृत्व गुण कसे जोपासावे व सर्व गोष्टींचा ताळमेळ कसा घालावा याबद्दल मार्गदर्शन केले . तसेच आपले आईवडील , मार्गदर्शन करणारे शिक्षक व समाजातील इतर घटक यांच्यामुळे आपण घडत असतो , त्या सर्वांबद्दल कायम कृतज्ञ रहा असा मोलाचा सल्ला विद्यार्थी मित्रांना दिला . कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यार्थी मित्रांना दिला . कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे सी.ई.ओ. फ्रान्सिस बरेटो यांनी विद्यार्थ्यांना स्वंयशिस्त व स्व मूल्यमापन करण्याचा सल्ला दिला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे क्रीडा शिक्षक रामचंद्र बिराजदार यांनी केले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.