Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एस आर पी च्या वतीने रॅली व...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एस आर पी च्या वतीने रॅली व पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

लोणावळा (प्रतिनिधी): बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मावळ तालुक्याच्या वतीने कुसगांव ते लोणावळा भव्य पायी रॅली काढून अभिवादन करण्यात आले.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कुसगांव ते लोणावळा अशी भव्य दिव्य पायी रॅली काढण्यात आली तसेच जयंती निमित्त खाऊचे वाटप ही पक्षाच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह सर्व महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दर वर्षी या रॅलीचे आयोजन करण्यात येते.
यावेळी एस आर पी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नितीन साळवे, कुसगांव ग्रामपंचायत मा. उपसरपंच प्रवीण साळवे, नागेश गायकवाड , महेंद्र साळवे,विजय साळवे,एस आर पी चे मावळ तालुका उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, युवा नेते प्रवीण सरोदे, मावळ तालुका सरचिटणीस प्रदीप साळवे, नाणे मावळ युवा कार्याध्यक्ष गणेश गायकवाड,नाणे मावळ मा.कार्याध्यक्ष विलास गायकवाड, युवा नेते महेश थोरात, शेखर साबळे, प्रकाश भालेराव आदी पदाधिकारी यांच्या सह कुसगांव येथील लहान थोर महिला व तरुणांनी मोठया संख्येने या रॅली मध्ये सहभाग घेतला.

You cannot copy content of this page