Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडडॉ बाबासाहेब आंबेडकर " यांच्या जीवनावर पंचशीलनगर -"भारत पवार" यांनी संगीतबद्ध गावून...

डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या जीवनावर पंचशीलनगर -“भारत पवार” यांनी संगीतबद्ध गावून केले अभिवादन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) – ” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून हजारो अधिकार या भारतीय नागरिकांना व महिला वर्गाला बहाल केले तसेच त्यांचे थोर उपकार माझ्यावरही आहेत . त्यांनी सर्व समाजासाठी घेतलेले परिश्रम त्यामुळे आज आपण समाजामध्ये थाटामाटात जगत असून , माझ्या लहापणापासून असलेली मी संगीतबद्ध केलेले त्यांचे जीवन गीत गाणार , हि इच्छा त्यांच्या १३३ व्या जयंती निम्मित कर्जत नगर परिषद हद्दीतील पंचशील नगर – गुंडगे येथील ” ख्यातनाम गायक भारत पवार ” यांनी पूर्ण केले असून या गीताचा अनावरण कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात व आनंदात पंचशील नगर – गुंडगे येथे करण्यात आले.

यावेळी ” सुर सरगम ” टिमचे सदस्य तथा नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , साहिल शेख , सुनील जाधव , फारुख जळगावकर , संजय गायकवाड , रमेश येवले व इतर पंचशील नगर मधील सर्व मान्यवर तसेच त्यांच्या सौभाग्यवती रेणुका भारत पवार व त्यांच्या मुली भूमी पवार आणि आराध्या पवार या कार्यक्रमाला उपस्थित होत्या . तसेच व्हिडिओ एडिटर अंकुश कांबळे , त्यांचे सहगायक संतोष वाघमारे आणि रोहिणी दळवी उपस्थित होते . त्याचप्रमाणे मंगेश दळवी , अशोक आल्हाट , सचिन जगताप हे मित्र परिवार देखील आवर्जून उपस्थित होते.

भारत पवार हे उत्कृष्ट गायक असून त्यांना लहानपणापासून गीत गायनाची आवड आहे . त्यांचे ” करा ओके ” चे संगीत गीत कार्यक्रम कर्जत तालुक्यात तसेच मुंबई , पुणे , येथे मोठ्या प्रमाणात होत असतात . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित त्यांच्या जीवनावरील गीत संगीतबद्ध करून ते गायल्याने आज त्यांची खूप वर्षाची ईच्छा पुर्ण झाली असल्याचे मत त्यांनी या मंगलमय प्रसंगी व्यक्त केले . यावेळी सर्वांनी त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page