Friday, February 23, 2024
Homeपुणेलोणावळाडॉ बाबासाहेब आंबेडकर 132 व्या जयंतीनिमित्त जनसेवा तरुण मंडळातील भीमसैनिक ज्योत आणण्यासाठी...

डॉ बाबासाहेब आंबेडकर 132 व्या जयंतीनिमित्त जनसेवा तरुण मंडळातील भीमसैनिक ज्योत आणण्यासाठी महाड येथे रवाना…

लोणावळा (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त महाड ते वाकसई भीम ज्योत आणण्यासाठी वाकसई जनसेवा तरुण मंडळ महाडला रवाना झाले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा सर्वत्र जल्लोषात साजरा होत असतो यंदाच्या वर्षी 132 व्या जयंती निमित्त वाकसई मावळ येथील भीम सैनिकांनी आज दुपारी महाड येथे भीम ज्योत आणण्यासाठी प्रस्थान केले असून उदया सायंकाळी या भीम ज्योतीचे आगमन वाकसई येथे मोठया थाटामाटात आगमन होणार आहे.
यावेळी जनसेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष राहुल देसाई यांच्या अध्यक्षेतेखाली प्रमोद देसाई,अविनाश देसाई,अतुल देसाई,आकाश देसाई, निलेश खंडागळे,प्रशांत देसाई,राहूल तायडे,अक्षय देसाई, संजय गायकवाड, संतोष देसाई, वैभव देसाई, विकास सोनवणे,अजय पगारे,श्रीकांत देसाई,सागर धनवटे,सागर कुंभार,अनोज देसाई, दिपक गुप्ता,प्रमोद धनवटे,वेदांत मोरे, विनीत मोरे,आनंद देसाई, निखील कसबे,ज्ञानेश्वर देसाई, निलेश जगताप, रुपेश भालेराव, प्रथमेश भालेराव आदी भीमसैनिकांनी भीमज्योत आणण्यासाठी सहभाग घेतला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page