Thursday, November 21, 2024
Homeपुणेदेहूरोडतपासासाठी घ्यायला आलेल्या पोलीसावर वार करून आरोपीचा आत्महत्याचा प्रयत्न,देहूरोड येथील घटना…

तपासासाठी घ्यायला आलेल्या पोलीसावर वार करून आरोपीचा आत्महत्याचा प्रयत्न,देहूरोड येथील घटना…

देहूरोड (प्रतिनिधी): पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका आरोपीला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर ब्लेडने वार करत “मला पकडले तर तुम्हाला दाखवितो, मी आत्महत्या करतो”असे बोलून स्वतःच्याही हातावर ब्लेडने वार करुन स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी 3:45 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे जुना हायवे रोडवर सेंट्रल चौक देहुरोड इथे घडला आहे.
याबाबत संतोष रामदास काळे (वय 35, व्यवसाय – नोकरी, रा. आराध्या बिल्डींग, देहुगाव, ता हवेली जि पुणे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी आरोपी जलसिंग राजपुतसिंग दुधानी (वय 35, रा. हल्ली जांभुळगाव, ता मावळ जि पुणे) याच्यावर देहुरोड पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 353, 309, 352, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाळुंगे पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 19/2023 भादवि कलम 454, 380, 34 या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी जलसिंग राजपुतसिंग दुधानी याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस अधिकारी संतोष रामदास काळे हे सेंट्रल चौक देहुरोड इथे आले होते. तेव्हा काळे यांनी फिर्यादीला पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून कायदेशीर ताब्यात घेत असताना आरोपी जलसिंग याने शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी आणि स्वतःची अटक टाळण्यासाठी जाणीवपूर्वक काळेंच्या अंगावर धावून जात त्यांना धक्का देवून स्वतः जवळील ब्लेड हातामध्ये घेऊन काळेंच्या चेहऱ्यावर मारण्याचा प्रयत्न केला.तसेच, ““मला पकडले तर तुम्हाला दाखवितो, मी आत्महत्या करतो”असे बोलून स्वतःच्याही हातावर ब्लेडने वार करुन घेतले.
या प्रकारात आरोपी जलसिंह दुधानी जखमी झाल्याने त्याला पुणे येथे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस सब इन्सपेक्टर थिटे हे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page