Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडतमनाथ येथे सदस्य महेंद्र भोईर व सौ. आरती भोईर आयोजित " हळदी...

तमनाथ येथे सदस्य महेंद्र भोईर व सौ. आरती भोईर आयोजित ” हळदी – कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा कार्यक्रम ” जल्लोषात !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिरसे ग्रामपंचायत हद्दीत शिवसेनेचे सदस्य महेंद्र हरिभाऊ भोईर व सौ आरती महेंद्र भोईर यांनी तमनाथ येथे आयोजित केलेल्या ” हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा ” या कार्यक्रमाला या परिसरातील महिलांनी लाक्षणीय उपस्थिती दर्शवून या खेळाला रंग आला .
छोटे भाउजी म्हणून अँकर क्षेत्रात उदयास आलेले दिपक दिसले यांची नक्कल , सुमधुर बोल , हजरजबाबीपणा , कला कौशल्य , त्यांची अदा , या सर्वांचा मेळ जमलेल्या माय भगिनी हसून हसून या कार्यक्रमाला लाख मोलाची रंगत आली . यावेळी अनेक कार्यक्रम घेवून हा खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा झाला . यावेळी आयोजित कार्यक्रमास रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , मा. उप सभापती मनोहर दादा थोरवे , जिल्हा युवा सेना सचिव संदीप शेठ भोईर , सरपंच सौ. आरती भोईर , सौ. रेश्माताई म्हात्रे – महिला तालुकाप्रमुख कर्जत , सौ. सुमन भोईर – संघटिका बीड जि. पं. प्रभाग , सौ. अरुणा भोईर – मा. सदस्या शिरसे, सौ. कविताताई जाधव – उप तालुका संघटिका , शैला गुरव – सदस्या, कल्पना गायकवाड , भगवान घोडविंदे – संघटक , बीड जि. पं. प्रभाग , अर्चना वांजळे – सदस्या , शोभा पवार, गीता देशमुख , मंजुळा डांगरे , भुर्या वाघमारे , इंस्टाग्राम स्टार – सौ. शिवाण्या बोराडे , शिव व्याख्याती कु. सायली भोसले , विजय देशमुख , सुनील आप्पा गायकवाड , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . या सर्वांना सदस्य महेंद्र भोईर व सौ. आरती भोईर यांच्या हस्ते शाल – पुष्पगुच्छ – सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर व सरपंच सौ. आरती भोईर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला , तर इतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी चूल आणि मूल च्या उंबरठ्याबाहेर महिलांना विरंगुळा म्हणून हास्य कार्यक्रमाने आपल्या कुटुंबातील दैनंदिन कामातून वेळ काढून थोडी खुशी – थोडी हंसी , थोडा खेळ – थोडा विरंगुळा , तर महिलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी खास महिलांसाठी शिवसेना – युवा सेना शिरसे – तमनाथ – आडिवली या शिरसे ग्रामपंचायत हद्दीत आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे आयोजक सदस्य महेंद्र हरिभाऊ भोईर व सौ. आरती महेंद्र भोईर यांचे कौतुक केले . ते पुढे म्हणाले की , हळदी कुंकू हे आपले संस्कार कार्यक्रम आहेत , या द्विगुणित खेळाचा आनंद घ्या . तर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीत खूप विकास कामे होत आहेत , रस्ते सर्व सुरळीत झाले असल्याने वाहतूक करताना तरुणांनी काळजी घ्या , तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर स्पिडब्रेकर टाकले आहेत , यावर त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी युवासेना जिल्हा सचिव संदीप शेठ भोईर , माजी सदस्य विजय देशमुख , शिव व्याख्याती सायली भोसले यांनी देखील मार्गदर्शन केले . तर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भोईर यांनी स्थानिक महिलांसाठी रोजगार उभी करण्याची तळमळ असून सर्व महिलांचा सन्मान होण्यासाठी या ” हळदी कुंकू व खेळ पैठणीचा ” या कार्यक्रमाची संकल्पना आखली आहे , आपल्या शरीरात असलेल्या स्त्री शक्तीला जागृत करा , असे मत व्यक्त केले . ” हळदी – कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा ” खेळात दहा खेळ घेवून अनेक भव्य बक्षिसे , पैठणी , देवून विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आले . या मनोरंजनाने भरलेल्या , बहारदार मनोरंजनात्मक ” खेळ पैठणीचा ” या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page