तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाला अटक, रसायनी पोलिसांची कारवाई..

0
163

खालापूर -दत्तात्रय शेडगे.

शरीरसंबंध करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे 19 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या प्रशांत पाटील( रा जाताडे ता पनवेल ) याला रसायनी पोलिसांनी अटक केली आहे, रिस येथे राहण्याऱ्या तरुणीचे प्रशांत याने अश्लीस व्हिडिओ तयार केले होते.

वारंवार शरीरसंबंधासाठी प्रशांत तरुणीला धमकावत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता बदनामीच्या भीतीने तरुणीने राहत्या घरी ९ जुलै रोजी पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती, या घटनेचा तपास रसायनी पोलीस करीत असताना प्रशांत पाटील यांचे नाव पुढे आल्याने रसायनी पोलिसांनी त्याला बुधवारी ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे या करीत आहेत,