Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडतरुण तडफदार आयुब तांबोळी हे खालापूर तालुक्याच्या तहसिलदारपदी..

तरुण तडफदार आयुब तांबोळी हे खालापूर तालुक्याच्या तहसिलदारपदी..

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार यांची रत्नागिरीला बदली झाल्याने खालापूरच्या तहसीलदारपदी आयुब तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तांबोळी कार्यरत होते.

शुक्रवारी त्यांच्या बदलीची ऑर्डर होताच 20 सप्टेंबर सोमवारी तांबोळी पदभार स्वीकारल्याने खालापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.इरेश चप्पलवार यांची रत्नागिरीला बदली झाल्याने खालापूरचे तहसिलदार पद रिक्त होते. चप्पलवार यांच्या बदलीची ऑर्डर झाल्यानंतर वेळेपूर्वी बदली झाल्याचे कारण देत चप्पलवार मॅटमध्ये गेल्याने सुमारे महिनाभर तहसिलदार पदाचा घोळ सुरू होता.

चप्पलवार यांनी खालापूरचा पदभार सोडल्यानंतर कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख यांच्याकडे काही दिवस खालापूरचा अतिरिक्त कार्यभार होता. 17 सप्टेंबर शुक्रवारी आयुब तांबोळी यांच्या नियुक्तीचे आदेश निघाल्याने खालापूरकरांची प्रतीक्षा संपली.सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावतानाच लोकांच्या मनात विश्वास निर्माण करत तहसील कार्यालयाला पुन्हा शिस्त लावावी लागणार आहे.

राजेंद्र चव्हाण, दीपक आकडे यांच्यासह तहसिलदार म्हणून काम केलेल्या अनेक अधिकार्‍यांची आजही आठवण खालापूर तालुक्यात काढली जाते. आयुब तांबोळी यांनीही त्याच पद्धतीने काम करावं अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असून हे आव्हान ते कसे पेलतात याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान सोमवारी 20 सप्टेंबर रोजी आयुब तांबोळी पदभार स्वीकारल्यानंतर राजकीय, सामाजिक व इतर सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी आणि पत्रकारांनी भेट घेवून शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page