Thursday, September 12, 2024
Homeपुणेमावळतळेगावात मल्हार सेना करणार अर्थ जल समाधी आंदोलन...

तळेगावात मल्हार सेना करणार अर्थ जल समाधी आंदोलन…

प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे

मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून मल्हार सेना मावळ तालुका यांच्या वतीने 22 अक्टोबर रोजी जलसमाधी आंदोलन करणार आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एसटी चे सर्टिफिकेट (धनगर आरक्षण) मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने विविध संघटनाच्या वतीने रास्ता रोको,ढोल बजावो आंदोलन मोर्चे आदीसह विविध मार्गाने आंदोलन करून सरकार कडे आरक्षण मिळावे यासाठी मागणी करत आहेत.


मात्र आता पुन्हा धनगर आरक्षनाचा प्रश्न पेटला असून मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मल्हार सेना यांच्या वतीने अर्ध जल समाधी आंदोलन करणार असून मावळ तालुक्यातील तळेगाव येथील तलावात मल्हार सेना अर्ध जल समाधी आंदोलन करणार असल्याची माहिती मल्हार सेना मावळ तालुका अध्यक्ष रामजी कोळेकर यांनी दिली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page