Wednesday, May 29, 2024
Homeपुणेतळेगावतळेगाव दाभाडे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई,गोवा निर्मित विदेशी दारू साठ्यासह 62 लाख...

तळेगाव दाभाडे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई,गोवा निर्मित विदेशी दारू साठ्यासह 62 लाख 68 हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

तळेगाव (प्रतिनिधी):गोवा राज्य निर्मित विदेशी दारूसाठा महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनर वर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शुक्रवार दि.27 रोजी सकाळी 9:30 वाजता उर्से टोलनाका हद्दीत कारवाई करत कंटेनरसह दोन आरोपी व 62 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय 25, रा. ओटा, ता. सोनगढ, जि. तापी गुजरात) व मोहन दिनराम खथात (वय 34, रा. रुध्रपुरा, ता हुरडा जि.भिलवाडा राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपीना वडगांव मावळ न्यायालयाने 1 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1948 चे कलम 65 (अ) (ई) 80, 81, 83, 90, 103 व 108 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार दुय्यम निरीक्षक दीपक सुपे यांना उर्से टोलनाका हद्दीत बेकायदा विदेशी मद्य वाहतूक करणारा कंटेनर क्रमांक MH 01 N 8007 येणार असल्याची गुप्त माहिती नुसार, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दक्षता व अंमलबजावणी संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त ए. बी. चासकर, अधीक्षक सी.बी. राजपुत, उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. 27 रोजी सकाळी 9:30 वा.सदर ठिकाणी सापळा लावून कंटेनर अडवून , आरोपी गामित सिंगाभाई व मोहन खथात यांच्या कंटेनर ची तपासणी केली असता, गोवा राज्य निर्मित व गोवा राज्य विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचे 900 बॉक्स किंमत 47 लाख 52 हजार रुपये, कंटेनर, मोबाईल असा 62 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली.आरोपींना शुक्रवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, सखोल तपास करण्यासाठी बुधवार दि.01 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक दिपक सुपे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रवी लोखंडे, सागर धुर्वे, व जवान राहुल जौंजाळ, तात्याबा शिंदे, शिवाजी गळवे आणि वाहन चालक हनुमंत राऊत यांनी ही दमदार कामगिरी केली आहे.पुढील तपास दुय्यम निरीक्षक दीपक सुपे करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page