Friday, February 23, 2024
Homeपुणेतळेगावतळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा लेखपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा लेखपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…

मावळ (प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील लेखापालाने एका ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी त्याच्याकडे बिल रकमेच्या एक टक्के लाचेची मागणी केली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत लेखापालावर गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई 22 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या दरम्यान करण्यात आली.
नरेंद्र अनंतराव कणसे (वय 55) असे गुन्हा दाखल झालेल्या लेखापालाचे नाव असून याबाबत 38 वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे कंत्राट घेतात. त्यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या शवदाहिनीचे कंत्राट मिळाले आहे. दरम्यान त्यांनी कोरोना काळात सॅनिटायझरची फवारणी केली होती. त्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी लेखापाल कणसे याने तक्रारदार यांच्याकडे बिल रकमेच्या एक टक्के म्हणजेच पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर विभागाने पाच वेळा सापळा लावून लेखापाल कणसे याने लाच घेतल्या बाबत गुन्हा नोंदवला आहे.याप्रकरणाचा पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page