Thursday, September 12, 2024
Homeपुणेतळेगावतळेगाव दाभाडे येथील संजय कार्ले याचा दोन दिवसांनी पनवेल हद्दीत कारमध्ये आढळला...

तळेगाव दाभाडे येथील संजय कार्ले याचा दोन दिवसांनी पनवेल हद्दीत कारमध्ये आढळला मृतदेह…

रायगड (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे येथील एका व्यावसायिकाचा पनवेलजवळ मोटारीत गोळी घालून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांनी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे . संबंधित व्यक्ती गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याने प्रतिस्पर्धी टोळीकडून त्याचा खून करण्यात आला असावा , असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे .
संजय कार्ले असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या छातीत बंदुकीची गोळी मारल्याची खूण आढळून आली आहे .
मुंबई – गोवा महामार्गावर पनवेलजवळ तारा गावाच्या हद्दीत शुक्रवारी ऑडी कार क्र. ( MH . 14 GA .9585 ) कारमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळून आला . केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फार्म हाऊसजवळ मागील दोन दिवसांपासून गाडीत मृतदेह असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्यास मिळाली . तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली .
संबंधित ऑडी गाडी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले . लॉक असल्याने गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना अडचणी निर्माण झाल्या होत्या , मात्र तज्ज्ञांच्या मदतीने गाडीचे दार उघडण्यात यश आले . मोटारीत एका पुरुषाचा मृतदेह आढळला त्याच्या छातीवर बंधूकीच्या गोळया लागल्याचे निशाण आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे .
ऑडी कारमध्ये मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली . त्यामुळे त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती . तालुका पोलीसांकडून मृत संजय कार्ले याच्याविषयी बारकाई माहिती गोळा करण्यात येत आहे, मात्र तपासाच्या दृष्टीने अद्यापही कोणताही महत्त्वाचा धागादोरा मिळाला नसल्याचे समजते.
- Advertisment -

You cannot copy content of this page