Saturday, July 27, 2024
Homeक्राईमतळेगाव दाभाडे येथे 19 वर्षीय प्रणव मांडेकर याची निर्घृण हत्या…

तळेगाव दाभाडे येथे 19 वर्षीय प्रणव मांडेकर याची निर्घृण हत्या…

मावळ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे येथे 19 वर्षीय युवकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवार दि.6 रोजी रात्री 9:30 ते 10:30 च्या सुमारास तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे येथे घडला.
प्रणव उर्फ जय मांडेकर (वय 19, रा. इंदोरी, ता. मावळ ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मृत युवकाचे वडील अनिल ज्ञानेश्वर मांडेकर (वय 42, रा. इंदोरी, ता. मावळ ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रणवच्या निर्घृण हत्ते प्रकरणी पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.आरोपी कुणाल ठाकूर, ढुंगण बाळ्या उर्फ रोहन सुरते, विकी पवार, मंगेश हिरे, निलेश घायके, सागर गाडे, रितेश शिंदे, चिक्या शिंदे, प्रथमेश पवार अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मयत प्रणव याचा 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून कोयता व लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मयत प्रणव हा इंद्रायणी कॉलेजमध्ये एफ . वाय . बी . कॉमचे शिक्षण घेत होता.आपल्या मित्राचा वाढदिवस आहे असे सांगून तो घराबाहेर पडला होता.रात्री साडे नऊच्या सुमारास आई स्वाती यांनी मुलगा प्रणवला फोन केला तेव्हा त्याने जेवण झाले आहे . निघतच आहे असे म्हणून फोन ठेवला . मात्र , दीड तास उलटला तरी मुलगा का आला नाही म्हणून पुन्हा आईने फोन केला आणि तो फोन तळेगाव पोलिसांनी उचलला आणि प्रणवचा खून झाल्याचे आईला सांगितले.पोलीस ठाण्यात गेल्यानंतर समजले की , प्रणवच्या सोबत असलेल्या विशालची मंगेश या तरूनासोबत फोनवर बाचाबाची झाली होती . यातूनच हा प्रकार घडल्याचा त्यांना सांगण्यात आले.
प्रणवसह नऊ जण इदगाह मैदान कडोलकर कॉलनी येथे गप्पा मारत बसले होते . तेव्हा , मंगेशसह एकूण 20 ते 25 जणांचे टोळके सहा ते सात दुचाकीवरून तिथे आले . त्यांच्याकडे कॊयता , पालघन , लोखंडी रॉड होते . मंगेश प्रणव सोबत असलेल्या विशालला म्हणाला की तुला खूप मस्ती आली आहे . आता तुझी मस्तीच उतरवतो असे म्हटल्यावर सर्वजण घाबरले . प्रणवसह सर्वजण मिळेल त्या दिशेने पळायला लागले.
प्रणव धावत असताना काही अंतरावर ठेच लागून खाली पडला . तेव्हा , त्याला गाठून तो वर्माचा साथीदार आहे असे समजून त्याला कोयता , लोखंडी रॉडने वार करून ठार मारण्यात आले.खून केल्यानंतर टोळक्याने हवेत कोयता फिरवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.घाबरून तेथील दुकानदारांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या असे सांगण्यात येत आहे . या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page