Friday, February 23, 2024
Homeपुणेतळेगावतळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात एका मनोरुग्णाचा धुडगूस,अनेक वाहनांचे नुकसान…

तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात एका मनोरुग्णाचा धुडगूस,अनेक वाहनांचे नुकसान…

तळेगाव (प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात एका मनोरुग्णाने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून धुडगूस माजवला.
यामध्ये अनेक वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.हा थरार तब्बल दोन तास सुरु होता.इतकेच नाही तर हा मनोरुग्ण चक्क वाहतूक पोलीस चौकीवर चढल्यामुळे त्याला खाली उतरविण्यासाठी आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, भास्कर माळी, विश्वनाथ जावळीकर, गणेश ढोरे व तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाचे वाहन चालक बाळू ठाकर, फायरमन शेखर खोमणे, धिरज शिंदे, गणेश जावळेकर यांनी अथक प्रयत्न करून त्याच्यावर पाण्याचे फवारे मारून त्याला दोन तासाच्या थरारा नंतर खाली उतरवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page