if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
मावळ (प्रतिनिधी):आज तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीतील तळेगाव स्टेशन येथील नगरपरिषद तळे येथे पूरजन्य परिस्थिती ,आपातकालीन परिस्थिती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत डेमो कॅम्प घेण्यात आला.
सदर कॅम्पमध्ये ग्राम सुरक्षा दल सदस्य, वन्यजीवन रक्षक मावळ संस्था व राणीॲम्बुलन्स,विरा ॲम्बुलन्स बोट इत्यादी साहित्य वापरून सदरचा डेमो घेण्यात आला. यात एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याला कसे वाचवायचे याचे डेमो द्वारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच नागरिकांना देखील सदरचा डेमो दाखवण्यात आला.
त्याप्रसंगी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्यासोबत प्रशांत वाबळे,बाबाराजे मुंडे, कृष्णा साहेब व इतर पोलीस स्टाफ उपस्थित होता. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, संस्थेचे आपत्ती व्यावस्थापन सर्च आणी रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ ,भास्कर माळी,जीगर सोळंकी,सर्जेस पाटिल, विनय सावंत ,शुभम काकडे, सार्थक घुले , गणेश गायकवाड, अविनाश कार्ले ,गणेश सोंडेकर, विकी दौंडकर,कुनाल दाभाडे , श्रेयस भेगडे,सुरज शिंदे ,प्रशांत शेडे,गौरव चेपे,गणेश ढोरे आदिजण सहभागी झाले होते. यावेळी तळेगाव दाभाडे पोलिसांकडून या डेमो कॅंप करण्यासाठी संस्थेला जी संधी दिली त्याबद्दल रेस्कु टिम चे अध्यक्ष गणेश निसाळ यांनी सर्व पोलीस अधीकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.