Sunday, April 21, 2024
Homeपुणेतळेगावतळेगाव येथील ईगल तलावात बुडाल्याने 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू....

तळेगाव येथील ईगल तलावात बुडाल्याने 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू….

तळेगाव दाभाडे दि. 25 : तळेगाव येथील ईगल तलावात बुडाल्याने एका 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12: 30 वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेची वार्ता पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.

मलीना नवशाद शेख ( वय 12, रा. झवेरी कॉलनी, खळदे वस्ती,तळेगाव दाभाडे ) हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ती वस्तीतील मुलांसोबत ईगल तलावावर पोहण्यासाठी गेली होती. परंतु तिला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याची खबर विद्युत कल्लू खान ( वय 30, रा. टेल्को कॉलनी, तळेगाव स्टेशन ) यांनी तळेगाव शहर पोलीस स्टेशनला दिली. तिच्या घरच्यांना व स्थानिकांना ही बातमी समजताच त्या सर्वांनी त्या तलावात उतरून तिचा शोध घेतला परंतु ती काही त्यांना सापडली नाही.
तेव्हा लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टिमला बोलावले असता शिवदुर्गचे महेश मसने, अशोक उंबरे, राहुल देशमुख, अभिजित बोरकर, अजय शेलार, चंद्रकांत बोंबले, दुर्वेश साठे, अनिल आंद्रे, निलेश गराडे, गणेश रौदळ, भास्कर माळी, निनाद काकडे यांच्या पथकाने पाण्यात शोधकार्य राबवत सायंकाळी 4:15 मी.च्या सुमारास मलिनाचा मृत देह बाहेर काढला व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
- Advertisment -

You cannot copy content of this page