तळेगाव येथे स्काऊट गाईड परिवाराने केले वृक्षारोपण..

0
24

तळेगाव (५ जून) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने भारत स्काऊट आणि गाईड तळेगाव दाभाडे परिवाराच्या वतीने सहाय्यक जिल्हा आयुक्त विजयकुमार जोरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शेजारील नगरपरिषदेच्या वनराईत वृक्षारोपण करण्यात आले.


या उपक्रमांतर्गत पाच वटवृक्ष व अन्य वृक्षांचे रोपण करण्यात आले. वृक्षसंगोपन व स्वच्छता याबाबत सहयोग देण्याचे आश्वासन जोरी यांनी दिले.


या उपक्रमात स्काऊटर विशाल मोरे (इंद्रायणी स्कूल), विजय जाधव (स्वामी विवेकानंद स्कूल), स्काऊटर सुनिल खंडाळे (न.पा.कर्मचारी) तसेच वन्यजीव संरक्षक निलेश गरुड, प्रियंका शर्मा, संजय निखाळे, प्राध्यापक महाजन सर व निखिल महाजन इत्यादींनी सहभाग घेतला.