Monday, April 15, 2024
Homeक्राईमतळेगाव शहरात भर दिवसा किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला…

तळेगाव शहरात भर दिवसा किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला…

मावळ(प्रतिनिधी):तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर आज भरदुपारी तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात गोळीबार तसेच कोयत्याने वार केला गेला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी नाळ जोडलेल्या किशोर आवारे यांनी सहा वर्षांपूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून राजकारणातील आपले स्थान पक्के केले होते.
आज भरदुपारी अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर गोळीबार व कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page