Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडताकई रस्त्याची दुरावस्थामुळे अपघातांची मालिका सुरू - खड्ड्यामुळे ट्रक पलटी..

ताकई रस्त्याची दुरावस्थामुळे अपघातांची मालिका सुरू – खड्ड्यामुळे ट्रक पलटी..

(प्रतिनिधी -दत्तात्रय शेडगे)
खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू झाले. यासाठी साडेचार कोटी निधी खर्च पडणार आहे. एमएमआरडीए निधी व खोपोली नगरपालिका यांच्या माध्यमातून हा रस्ता नूतनीकरण होत आहे. दोन्ही बाजूनी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे, मात्र पाऊसाच्या तोंडावर ठेकेदार कडून काम बंद झाल्याने पूर्ण दुर्दशा बनली असल्याने ताकई व त्या पुढील सर्व गावातील नागरिक येथील कारखानदारी यांची प्रचंड अडचण झाली आहे.

चिखल व खोदकाम झाल्याने अरुंद रस्त्यावरून जाताना वाहने पलटी होऊन दररोज अपघात घडत असून 9 जून रोजी सकाळी एक ट्रक पलटी झाल्याचे पाहायला मिळाले.साडेचार कोटी खर्च होऊन नूतनीकरण होत असलेल्या या रस्त्याचे काम सहा महिन्यांच्या आत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यात फक्त खोदकाम होऊन ठेकेदार कडून काम बंद करण्यात आले आहे.

तर संपूर्ण रस्ता चिखल, खड्डेमुळे धोकादायक बनला आहे. दरम्यान रस्ता रुंदीकरण साठी आवश्यक जागा देण्यात तांत्रिक अडचणी व जागा मालकांचा विरोध होत असल्याने रस्त्याचे काम वादात सापडले आहे. या बाबत लवकरात लवकर तोडगा निघण्यासाठी येथील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व नेते नगरपालिका व जागा मालक बरोबर चर्चा करीत आहेत. मात्र अद्याप कोणताही तोडगा मान्य होत नसल्याने ठेकेदार कडून काम बंद ठेवण्यात आले असल्याचे नगरपालिका कडून स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे जनतेचे धोकादायक रस्त्यावरून प्रवास करतांना मात्र हाल सुरू आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page