Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडतीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा संपन्न !

तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे प्रवेशद्वार भूमिपूजन सोहळा संपन्न !

आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या हस्ते व खासदार आप्पासाहेब बारणे यांची प्रमुख उपस्थिती..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत नगरी पर्यटन नगरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जात असताना कर्जतच्या सौंदर्यात भर येण्यासाठी व मखमली तुरा म्हणून शोभण्यासाठी कर्जतचे प्रवेशद्वार आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नावाने करण्याचा संकल्प कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी केला होता.

त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या माध्यमातुन व नगरसेवक संकेत भासे यांच्या विशेष प्रयत्नाने कर्जत नगरपरिषद हद्दीत आज या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या शुभहस्ते व मावळचे खासदार आप्पासाहेब बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य प्रवेश द्वाराकरिता रु . ७९ लक्ष इतका निधी मंजूर झाला असून , सदर प्रवेशद्वारास आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. आदरणीय तीर्थरूप निरुपणकार नानासाहेब यांनी केलेले कार्य समस्त समाजास वंदनीय असल्याने या भूमीत त्यांच्या कार्याचा गौरव करणे गरजेचे असून या प्रवेशद्वारामुळे कर्जत नगरीच्या सौंदर्यात वेगळीच झळाली येणार आहे.

याचवेळी कर्जतमध्ये अनेक ठिकाणी भरीव कामाचे भूमिपूजन देखील आमदार महेंद्रशेट थोरवे , खासदार आप्पासाहेब बारणे , कर्जत न.प.च्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी खासदार आप्पासाहेब बारणे , आमदार महेंद्रशेट थोरवे , नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी ,मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील , उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , पालिकेचे गटनेते नितीन सावंत , महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे ,शिवसेनेचे सल्लागार भाई भरत भगत , संघटक संतोषशेट भोईर ,संघटक शिवराम बदे , पाणी पुरवठा सभापती राहुल डाळिंबकर , महिला व बालकल्याण सभापती संचिता पाटील , उपसभापती प्राची डेरवणकर , नगरसेवक संकेत भासे , त्याचप्रमाणे पालिकेचे नगरसेवक – नगरसेविका व तालुका प्रमुख उत्तमदादा कोळंबे , हालीवली सरपंच प्रमिला बोराडे ,मा.नगरसेवक संतोष पाटील ,मोहनशेट ओसवाल ,संघटक सायली शहासने , सुरेश बोराडे , ताम्हाणे , शिवसेनेचे पदाधिकारी , शिवसैनिक तसेच अनेक कर्जतकर या ऐतिहासिक भूमीपूजनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page