लोणावळा(प्रतिनिधी): तुंगार्ली पांगोळी गावाजवळ गौ हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.16 रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्तींकडून गो-मातेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सदर घटनेची माहिती मिळताच गावकरी व हिंदुत्ववादी संघटनांनी एकच गर्दी केली होती. घटनेच्या जागी एक हत्यार देखील सापडले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी तुंगार्ली, लोणावळा येथील नागरिकांसह हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना लोणावळा येथील तुंगार्ली गावाजवळ काही नराधमांनी गो-मातेची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळ्यासह खंडाळा, खोपोली, खालापूर परिसरातही अशाच पध्दतीने चोरी छुपके नियमांची पायमल्ली होत आहे, तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून चौकशी करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना व तुंगार्ली ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.