Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडतुंगार्ली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू…

तुंगार्ली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू…

लोणावळा : पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तुंगार्ली धरणात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि.5 रोजी सायंकाळी 6:11 वाजता घडली.
अभिषेक सिंह रावत ( वय वर्षे 22, मूळ गाव उत्तराखंड व सध्या राहणार झारा रिसॉर्ट खंडाळा ) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणाची माहिती आहे.अभिषेक हा त्याच्या तीन मित्रांसोबत तुंगार्ली धरण येथे पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. तरुण बुडाल्याची माहिती मिळताच शिवदुर्ग लोणावळा रेस्क्यू टिमचे महेश मसणे ,आनंद गावडे , विनायक शिंदे , कुणाल कडू , आकाश मोरे, प्रिन्स बैठा , मयुर दळवी, शनी सुतार, प्रनय अंभोरे, समीर देशमुख, प्रणव दुर्गे , साहिल दळवी, सचिन तारे, निलेश लाड,अतुल लाड, महादेव भवर, प्रविण देशमुख , दुर्वेश साठे, गणेश रौंधळ, अनिल सुतार , योगेश दळवी, समीर जोशी, राहुल देशमुख, शुभम कुंभार,सुनील गायकवाड,पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत शिंदे आदींनी
त्याचा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले परंतु रात्र झाल्यामुळे अंधारात शोध मोहीम राबविणे कठीण झाल्याने दि.6 रोजी सकाळी मृतदेह शोधण्यात यश आले.
शिवदुर्गं टिमला एक मुलगा बुडाला आहे अशी माहिती मिळताच सायंकाळी 6.30 वाजता रेस्क्यू टिम साहित्यासह तुंगार्ली धरणाजवळ पोचली.नेमकी घटना कशी घडली , कुठे घडली अशी प्राथमिक माहिती घेऊन शोध चालू केला . या दिवसात दिवस लहान व रात्र मोठी असते . त्यामुळे लवकरच अंधार पडला होता. तरीही दिड तास शोधकार्य चालू ठेवले होते. परंतु यश आले नाही. रात्रीच्या वेळेस पाण्यात काहीच दिसत नाही. अजू बाजूचे अंदाज येत नाही. व संपुर्ण टिमची सुरक्षा यांचाही विचार करुन दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता शोधकार्य सुरु केले.पाण्याची पातळी कमी झाली असल्याने बोट किंवा स्कुबा डायव्हिंग चा वापर केला नाही.अथक परिश्रमाने सकाळी वाजता मृतदेह सापडला.
शिवदुर्गं टीमने मृतदेह रेस्क्यू करून पुढील कारवाईसाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page