Friday, November 22, 2024
Homeपुणेमावळतुटलेल्या रस्ता दुभाजकामुळे वाढला अपघाताचा धोका ,रस्ते प्रशासनाचे दुर्लक्ष..

तुटलेल्या रस्ता दुभाजकामुळे वाढला अपघाताचा धोका ,रस्ते प्रशासनाचे दुर्लक्ष..

वाकसई : वाकसई तुकाराम नगर येथील मुंबई पुणे जुन्या महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्ता दुभाजक अस्त व्यस्त अवस्थेत पडले असून येथे महामार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे.

महार्गावर वाढते अपघात रोखण्यासाठी एम एस आर डी सी व आय आर बी कडून उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार क्रॉसिंग वर पांढरे पट्टे, रस्ता दुभाजकाची रंग रंगोटी अशी कामे सुरु असल्याचे दिसून येते. परंतु काल रात्री वाकसई चाळ येथील संत तुकाराम नगर जवळील रस्ता क्रॉसिंग ठिकाणी अज्ञात वाहनाने रस्ता दुभाजक उडविले असून सिमेंट चे तुकडे महार्गावर मध्येच असल्यामुळे याठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.

मात्र आज पूर्ण दिवस उलटला तरीही याकडे आय आर बी च्या कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी याठिकाणी कोणताही मोठा अपघात होण्यापुर्वी आय आर बी कंपनीने या दुभाजकाचे काम त्वरित करून नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page