लोणावळा : “हॅपी थोट्स” नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 24 नोव्हेंबर ला ईम्पिरियल ग्रेन्ड लोणावळा येथे रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन संपर्क बालग्राम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमितकुमार बॅनर्जी आणि डॉ. गौरव धंदुके यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तेजज्ञान फाऊंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा परिचय श्री संजय बोधानी यांनी करून दिला. जीवनात स्वल्पविराम घेण्याचे महत्त्व पटवून देत ध्यानात बसल्यास आपल्याला सर्वोच्च आनंदाचा स्व अनुभव होईल असे ते म्हणाले. तेज गुरू सरश्री यांच्या ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. ध्यान का आणि कसे करावे, मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावर प्रकाश टाकला. ध्यान हेच मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. सर्व उपस्थितांना 21 मिनिटाचे ध्यान अनुभवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी 100 पेक्षा जास्त साधक आणि नागरिक सहभागी झाले होते.
उपस्थितांनी मनोभावे कार्यक्रमाचा आनंद घेतला. श्री प्रमोद गावडे यांनी आपल्या विचारातून उपस्थितांनासंबोधित केले आणि साधनेसाठी प्रेरणा दिली.फाउंडेशनच्या 25 वर्षांच्या प्रवासाची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या समारोपात जवळपास सर्व उपस्थितांनी 21 दिवसांचे ध्यान चैलेंज घेण्याचा संकल्प केला. असे कार्यक्रम भारतातील सुमारे 125 शहरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. ज्यामुळे संपूर्ण देशभर ध्यानाच्या माध्यमातून शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.