खोपोली-(दत्तात्रय शेडगे )गेल्या दोन दिवसापासून तोक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांची झोप उडवली आहे आधीच कोरोनाच्या महामारीतून हा मच्छीमार बांधव कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत होता तर पुन्हा एकदा त्याच्यावरती नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून मोठं संकट उभा राहिला आहे.
महा आणि क्यार वादलानंतर त्यांच्यावर कोरोनाची सावट आले त्यानंतर निसर्ग चक्रीवादलाचे सावट त्यानंतर पुन्हा कोरोना लोकडाउनचे सावट आणि आता तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांचा कंबरडेच मोडले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हा मच्छीमार बांधव आपल्या उपजीविकेसाठी कुठे ना कुठे धडपड करीत आहे परंतु कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हा मच्छीमार बांधव गेल्या दोन वर्षापासून संकटात सापडला आहे त्यातच महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी मदत न मिळाल्याने आता त्यांचे समोर त्यांच्या उपजीविकेचे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
आम्ही गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहोत की महा आणि कायर चक्रीवादळाचे नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच निसर्ग चक्रीवादळाची भरपाई ही लवकरात लवकर देण्यात यावी परंतु आज रोजी पर्यंत महाराष्ट्र सरकारने मच्छीमारांच्या तोंडाला फक्त पान पुसली आहेत असे आरोप ॲड. चेतन पाटील यांनी केला आहे.तोक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचे खुप नुकसान झाले असून त्यांच्या होड्या, जाळे, घरे, फळबागा तुटल्या असल्याने मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच स्थानिक कलेक्टर यांनी नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशा त्यांनी मागणी केली आहे.
निसर्ग चक्रीवादळ मध्ये रायगडच्या परवाने अधिकाऱ्यांनी व सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्ताने तेथील सातशे ते आठशे बोटींचे परवाने व्ही आर सी हे रिन्यू न केल्याने त्यांना निसर्ग चक्रीवादळ मध्ये नुकसानभरपाईसाठी दावेदारी करता आली नाही ह्याची सर्वस्व जबाबदारी रायगड जिल्ह्यातील परवाना अधिकारी व सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त हे आहेत या सर्वांची तक्रार आम्ही मत्स्यव्यवसाय आयुक्त श्री अतुल पाटणे व सह आयुक्त श्री राजेंद्र जाधव यांना करून सुद्धा आज रोजी पर्यंत त्या विषयावरती त्यांनी तोडगा काढलेला नाही.
असे अनेक प्रकार ह्या अधिकाऱ्याच्या व मत्स्य व्यवसाय विभागाच्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे आज मच्छीमार बांधवांना हे नुकसान भोगावे लागत आहे. माझी प्रामुख्याने मागणी आहे की जे मच्छीमार बांधव बेपत्ता झाल्या किंवा या वादळामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाची मदत त्वरित सरकारने करावी व ज्यांचे बोटींचे, जाळ्यांचे, घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे अशांना त्वरित आर्थिक मदत ही सरकारने करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलच्या वतीने हे सर्व मच्छीमार बांधव मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आता शांत बसणार नाही.
कोकणातील मच्छिमार बांधवांनी ज्या पक्षांना मदत करून एवढा मोठा केला आहे त्या पक्षाचे सरकार असून सुद्धा मुंबईतील मच्छीमार बांधवांना व कोकणातील मच्छीमार बांधवांना एवढे हाल सोसावे लागत आहेत म्हणजे फक्त मतदानासाठी या पक्षांना मच्छिमार बांधवांची आठवण येते व जेव्हा त्यांच्यावरती आस्मानी संकट येतो नैसर्गिक संकट येतो तेव्हा यांना नुकसानभरपाई देताना यांचे हात आकडत असल्याचे आरोप भाजपा मच्छीमार सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲड. चेतनदादा पाटील यांनी केला आहे.