![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
खोपोली (प्रतिनिधी) : दक्षता सेवा फौंडेशनचा पद ग्रहण समारंभ दि.3 रोजी खोपोली येथे संपन्न झाला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक व ओळख पत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा वंदनाताई मोरे व सिनेसृष्टी,कार्याध्यक्ष, रंगायन प्रतिष्ठान नाट्य संस्थापक लेखक दिग्दर्शक मनोज येरुणकर हे प्रमुख पाहुणे लाभले.
दक्षता सेवा फौंडेशन हे अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासना सोबत अविरत कार्य करत असून सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न शील आहे.या फौंडेशनचे कार्य अप्रतिम आहे. आणि असेच चांगले कार्य करताना मी सुद्धा या फौंडेशनच्या खांद्याला खांदा लावून असणार आहे असे प्रतिपादन वंदनाताई मोरे यांनी यावेळी बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना मोरे व प्रमुख पाहुणे मनोज येरुणकर यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करून,दक्षता सेवा फौंडेशन च्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक व ओळख पत्र प्रदान करण्यात आले. दक्षता सेवा फौंडेशनच्या संस्थापक उपाध्यक्षा कविता खोपकर यांनी फौंडेशनच्या वतीने मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी दक्षता सेवा फौंडेशन रायगड जिल्हाध्यक्ष व संस्थापक संचालक मधुकर घारे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष व संस्थापक संचालक निलेश विचारे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख व संस्थापक संचालक राजू रणवीर,रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अक्षरा चौधरी, खालापूर तालुका महिला अध्यक्षा वर्षाताई मोरे, खोपोली शहर महिला अध्यक्षा जयमालाताई पाटील, खोपोली शहर अध्यक्ष संजय पाटील,रायगड जिल्हा सचिव, रजनी म्हामूणकर, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख रमाकांत म्हामूणकर, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा सुलक्षणा दाभाडे, खजिनदार किशोरी चेऊलकर, खोपोली शहर सचिव किशोर शेळके,कर्जत तालुका उपाध्यक्ष रमेश धुळे, कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख महेश मिसाळ,अविनाश चौधरी,संध्या पाटील, रेखा मोदी,संगीता पाटील, अरुण कडू, भरत पाटील आदी पदाधिकारी व सदस्यांच्या प्रचंड उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला.