खोपोली- दत्तात्रय शेडगे
राष्ट्रवादीचे युवा नेता बालाजी भागवत सलगर यांचा आरोप…..
धनगरांचा एकटा आमदार निवडून येतो तरी त्यांना मंत्रीपद दिलं हे सोलापूर जिल्हातील काही पोटदुखी लोकांना सहन होत नाही.कोरोना महामारीच्या काळात पालकमंत्री यांच्या सोबत येऊन काम तर केले नाही परंतु काम करणारे पालकमंत्री यांनाही काम करू देत नाही कोरोना महामारी ही फक्त सोलापूर जिल्ह्यात आहे असे नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात आहे.
अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी सरकार, प्रशासकीय अधिकारी,डाॅक्टर प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत आता कोरोना महामारीवर टीका टिप्पणी केली तर लोकांनी मुर्ख समजु नये म्हणून नविन मुद्दा उपस्थित केला उजणी धरणाचे पाणी इंदापुरला पळवले असा बालिशपणाचा आरोप करून खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे इंदापुर शहरात मुबलक भरपुर पाणी आहे पाणी पळवण्याची गरज नाही पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याचा पालक आहे त्या नात्याने पालक म्हणून जबाबदारीने सांगितले जर पालकमंत्री म्हणून सोलापूर शहराचे पाणी पळविले असेल तर मंत्रीपदच काय तर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेऊ जर आरोप खोटा निघाला तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा असे बालाजी भागवत सलगर यांनी सांगितले.