Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडदस्तूरी येथे चोरट्यानी गायीची केली हत्या, जिवंत गाईला कापून गोमांस पळवले…

दस्तूरी येथे चोरट्यानी गायीची केली हत्या, जिवंत गाईला कापून गोमांस पळवले…

वारंवार घडनाऱ्या घटनेने शेतकरी हैराण……

घाटमाथ्यावर असलेल्या दस्तूरी येथे अज्ञात चोरट्यानी गोमांसाठी गायीची हत्या करून तिचे गोमांस चोरुन नेल्याची घटना आज पहाटे घडली.

खोपोली नगरपालिका हद्दीत दस्तूरी हे गाव असून याठिकणी अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी रस्त्याच्या कडेला एक गाय कापून तिचे गोमांस चोरून नेल्याची घटना घडली अश्याच प्रकारे तेथील रहिवासी असलेले शेतकरी भाऊ शेडगे यांच्याही म्हशींची हत्या करून तिचे गोमांस पळवीन्यात आले होते.
या परिसरात चोरट्यानी दुभती जनावरे चोरून नेण्याचा सपाटा लावल्याने येथील ग्रामस्थांचा दूध व्यवसाय संकटात आला असून या घटनेने शेतकरी वर्गात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे, डोंगराळ भागात उपजीविकेचा दूध व्यवसाय हा एकमेव पर्याय असल्याने सदरच्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी खोपोली पोलिसांना दिली असून खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून या घटनेचा तपास खोपोली पोलीस करीत आहेत, या घटनेची कसून चौकशी पोलिसांनी करून चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page