Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडदस्तूरी येथे शिवमल्हार कुलस्वामिनी पालखीचे केले स्वागत, शिंग्रोबा उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम..

दस्तूरी येथे शिवमल्हार कुलस्वामिनी पालखीचे केले स्वागत, शिंग्रोबा उत्सव कमिटीचा स्तुत्य उपक्रम..


खोपोली-दत्तात्रय शेडगे

जेजुरी येथे खंडोबा देवाची पालखी घेऊन जाणाऱ्या शिव मल्हार कुलस्वामिनी संस्था हाल ता शहापूर यांच्या पालखीचे आज दस्तूरी येथे शिंग्रोबा उत्सव कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

दरवर्षी मोठ्या उत्साहात खंडोबा देवाची पालखी वाजत गाजत शिव मल्हार कुलस्वामिनी संस्थेच्या वतीने पायी पालखी काढण्यात येते, मात्र यावर्षी देशावर आलेल्या कोरोना व्हायरसचे संकट यामुळे यावर्षी पायी पालखी न काढता खंडोबा देवाची पालखी गाडीतून नेण्यात आली.

ही पालखी बोरघाटात दस्तूरी येथे आली असता शिंग्रोबा उत्सव कमिटी वतीने यथोचित सत्कार करून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली यावेळीं हभप भाकरे महाराज, भरत भोईर, बाळूमामा भोईर, शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक बबन शेडगे, जगदीश भोईर, पंकज पाटील, सुधीर जाधव, सुनील पाटील, दीपक शेलार, बाळा तारमोळे, आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -