जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवले 93 टक्के गुण..
खोपोली- दत्तात्रय शेडगे
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथे असणाऱ्या आत्मोन्नत्ती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जांभुळपाडा या विद्यालयात खडई येथे राहणाऱ्या संदेश तुकाराम आवकीरकर याने दहावीत 93,40 %टक्के गुण मिळवून सुधागड तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला,संदेश च्या घरची परिस्थिती अतिशय बेताची ,राहायला नीट घरही नाही , वडील तुकाराम औकिरकर हे मोल मजुरी करून संदेश च्या शिक्षणासाठी मदत करत,शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने संदेशने नवनिर्माण चॅरिटेबल ट्रस्ट गुरुकुल जांभुळपाडा या हॉस्टेल मध्ये राहून दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
खालापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात खडई धनगर वाडा हे गाव असून या गावात अजूनही रस्ता, पाण्याची सुविधा नाही, या गावात संदेश राहत असून घरची परिस्थिती अत्यंत बेताची अश्या परिस्थितीत संदेश ने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दहावी मध्ये घवघवीत यश संपादन केले.
तर आत्मोन्नत्ती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयीन जांभुळपाडा या शाळेत 93,40% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक व तालुक्यातही प्रथम येण्याचा मान मिळवला,
संदेश च्या यशामुळे त्याने शाळेचे , हॉस्टेल व गावाचे नाव उंचावले असून सर्वच स्तरातून संदेश चे कौतुक होत आहेत.