Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदहावी बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी...

दहावी बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे . फेब्रुवारी – मार्च 2023 मधील दहावीची लेखी परीक्षा ही 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे . तर बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार आहे .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही घोषणा करण्यात आली आहे.त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नियोजन करता येणार आहे . राज्य मंडळाच्या फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे . दरम्यान , विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी , अभ्यास करावा , तसेच आतापासून परिक्षेसाठी नियोजन करावे , तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये , असे अवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page