दहावी मध्ये तालुक्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या संदेश आवकीरकर चा केला सत्कार..

0
115


शालेय वस्तू देऊन केला सत्कार ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचा स्तुत्य उपक्रम..

खोपोली- दत्तात्रय शेडगे
ऑल इंडिया धनगर महासंघ रायगड यांच्या वतीने इयता 10 वि मध्ये तालुक्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या संदेश तुकाराम आवकीरकर यांचा सत्कार करून शालेय साहित्य देण्यात आले,
सुधागड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या खडई धनगर वाडा येथे राहत असलेल्या संदेश तुकाराम आवकीरकर याने 10 वि मध्ये 93.40 % गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवून सुधागड तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला.


परंतु घरची परिस्थिती अत्यंत बेताची राहायला नीट घरही नाही अश्या परिस्थिती संदेश ने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संदेश ने आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळ पाडा या शाळेत इयता 10 वि मध्ये 93.40% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.


यांची दखल घेत ऑल इंडिया धनगर महासंघ रायगड जिल्हा यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून त्याला शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ऑल इंडिया धनगर महासंघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख महादेव कारंडे, रायगड जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष किशोर झोरे खालापूर तालुका युवक अध्यक्ष ठकुराम झोरे, पनवेल तालुका युवक अध्यक्ष लक्ष्मण बावदाणे, संतोष घाटे, गणेश गोरे, झिमा बावदाणे आदी उपस्थित होते.